Welcome to MORNING INDIA NEWS   Click to listen highlighted text! Welcome to MORNING INDIA NEWS
क्राइमधर्ममहाराष्ट्र
Trending

58 महिलावर लैंगिक अत्याचार

58 महिलावर लैंगिक अत्याचार

एखादी पीडित महिला भेटायला आली तर तिला ताटकळत ठेवणाऱ्या आणि महिलांच्या तक्रारीत राजकिय नेत्यांची बाजू घेणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्ष बाई भोंदू आणि महिलांना फूस लावून शारीरिक संबंध स्थापित करणाऱ्या विकृतासाठी छत्री धरते, त्याचे पाय धुते अन् वरून राज्यातील पालकांना आपल्या मुलीला एका हातात संविधान द्या म्हणते यापेक्षा मोठा विरोधाभास काय असू शकतो?

सत्तेच्या वर्तुळातील परिघात असलेल्या रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीतील वजनदार नेत्यांशी जुळवून घेऊन महिला आयोगाचे अध्यक्षपद मिळवले.त्याआधी जेव्हा विधानसभा लढण्याविषयी विचारणा झाली तर चाकणकर बाईंनी नकार दिला होता.सोशल मीडियावर यांच्यावर कुणी काही बोललं तर महिला आयोगाच्या पदाचा वापर करून लगेच गुन्हे दाखल करण्याचे आदेश या बाई देतात.

जेव्हा मागच्या काही हाय व्होल्टेज प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि त्यांची पोरं अडकली तेव्हा महिला आयोग अध्यक्ष त्यांच्या पक्षाच्या पुरुषांच्या बाजूने होता.विशेष म्हणजे महिलांनी त्यांचा छळ होतोय अशा तक्रारी या बाईंकडे केलेल्या पण अशा तक्रारीची दखल घेण्यास महिला आयोगाला वेळ नाही पण एखाद्या लिंगपिसाट व्यक्तीसाठी छत्र्या धरायला मात्र भरपूर वेळ आहे.

महिला आयोग हे पद फक्त प्रतिष्ठेचे पद असून त्याचा आणि महिलांच्या समस्यांचा दूरदूर पर्यंत संबंध राहिलेला नाही.सत्तेच्या सारीपाटात आपल्या पक्षातील पुरुषांना पूरक भूमिका घेणारा महिला आयोग महिलांचा कधीच होऊ शकत नाही.

© अरुण सुखदेव डमाळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!