Welcome to MORNING INDIA NEWS   Click to listen highlighted text! Welcome to MORNING INDIA NEWS
क्राइममहाराष्ट्र

पाथर्डी तालुक्यात अनेक लोकांची फसवणूक

समर्थ क्रॉप केअर कंपनीकडून दोन कोटींचा गंडा

पाथर्डीत ‘दुबईवारी’चे स्वप्न पडले महाग; ‘समर्थ क्रॉप केअर’कडून दोन कोटींचा गंडा

​पुणे येथील प्रशांत गवळी याने ‘समर्थ क्रॉप केअर’ कंपनीच्या माध्यमातून जादा व्याजाचे आमिष दाखवून पाथर्डी शहरातील ४० ते ५० तरुणांची सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. सोशल मीडियाद्वारे साखळी पद्धतीने गुंतवणुकीचे आवाहन करून, सुरुवातीला परतावा आणि दुबईवारीचे प्रलोभन दाखवून त्याने लाखो रुपये उकळले. मात्र, दीड वर्षानंतर व्याज आणि कमिशन मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदार आणि एजंट यांच्यात हाणामारी झाली. हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. पुणे येथे आरोपीवर आधीच गुन्हा दाखल असून, पाथर्डीतील फसवणुकीचे प्रकरणही आता तिथेच वर्ग केले जाणार आहे. पोलीस तपासात फसवणुकीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Oplus_131072

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!