शिंदे शिवसेना व भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये र***
सातारा या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये जोरदार भांडण
सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षात भारतीय जनता पक्षाने अत्यंत धक्कादायक आणि आक्रमक खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना धोबीपछाड दिली आहे. राजकीय गणिते आणि संख्याबळाचा अचूक वापर करत भाजपने जिल्हा परिषदेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशी दोन्ही महत्त्वाची पदे आपल्या खिशात टाकली आहेत.
या संपूर्ण संघर्षात राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी अत्यंत धाडसी भूमिका बजावली. पोलिसांच्या वॉचवर असलेल्या आणि अटकेची भीती असलेल्या सदस्यांना त्यांनी सुरक्षितरित्या सभागृहात पोहोचवण्यासाठी थेट स्वतःची गाडी मैदानात उतरवली.
सदस्यांना सभागृहात घेऊन जात असताना पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली. या गोंधळात आणि ओढाताणीमध्ये मंत्री शंभुराज देसाई यांच्या हाताला दुखापत देखील झाली, तरीही त्यांनी सदस्यांना सभागृहापर्यंत सुखरूप पोहोचवले. त्यांच्या या भूमिकेची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
#ShambhurajDesai #sataranews



